Ads
Ads

आमदाबाद येथील श्रद्धा जाधव हिने कृषी अधिकारी पदाला घातली गवसणी

आमदाबाद येथील श्रद्धा जाधव हिने कृषी अधिकारी पदाला घातली गवसणी

शिरूर (प्रतिनिधी ) नितीन थोरात 

आमदाबाद येथील श्रद्धा चंद्रकला राजेंद्र जाधव यांनी लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षेत यश मिळवत कृषी अधिकारी पदाला गवसणी घातली.

      आमदाबाद येथील शेतकरी राजेंद्र गणपत जाधव  यांचे लहान वयातच पितृछत्र हरपले होते.त्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतून  मार्ग काढत शेतीच्या तुटपुंज्या उत्पन्नातून आपला उदर निर्वाह करत त्यांनी  तीन कन्या चे उच्च शिक्षण केले.

            शेतीच्या येणाऱ्या उत्पन्नातून काबाड कष्ट करून   तीनही मुलींना उच्चशिक्षित केले यापैकी द्वितीय कन्या श्रद्धा या बीएससी ऍग्री शिक्षण पूर्ण केले होते. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन कृषी अधिकारी पदाला गवसणी घातली. काही वर्षांपूर्वीच त्या तालुक्यातील बेट भागातील नेते  सावित्राभाऊ  थोरात यांचे चिरंजीव अक्षय थोरात यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आहेत त्यांच्या या यशाने त्यांचे माहेर आमदाबाद आणि टाकळीहाजी परिसरातून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे .