Ads
Ads

बेट भागात अवैध दारू विक्री होते जोरात! वसुली होते लाखोंच्या घरात! पोलीस अधीक्षक साहेब जरा इकडे लक्ष द्याच!

 

शिरूर (भगवान श्रीमंदिलकर )
   
                    शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यामध्ये वाढ झाली असून पोलीस प्रशासन फक्त मलिदा गोळा करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाणही वाढले असल्याचे समोर येत आहे. याकडे पोलिसांना लक्ष देण्यास वेळच मिळत नसल्याचे कळते.
                 शिरूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मांडवगण फराटा, न्हावरे तसेच भेट भागातील टाकळी हाजी अशा तीन ठिकाणी पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्या परिसरातील नागरिकांना तत्काळ सेवा सुविधा व मदत मिळण्यासाठी या चौकी आहेत. तेथील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येण्याची गरज भासली नाही पाहिजे यासाठी या चौकीमध्ये  सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, यांच्यासह पोलीस हवालदार, पोलीस नाईक, तसेच पोलीस शिपाई यांची नियुक्ती करण्यात येते. जेणेकरून परिसरातील नागरिकांना तत्काळ मदत मिळाली पाहिजे हा उद्देश या मागचा आहे.
                    बेट भागातील टाकळी आजी पोलीस चौकीमध्ये एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक, या अधिकाऱ्यांसह  दोन हवलदार किंवा पोलीस नाईक तसेच तीन पोलीस शिपाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते.
                      टाकळी आजी पोलीस चौकीचे हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असून येथील भागातील प्रत्येक धाब्यावर व हॉटेलवर खुलेआम दारू विक्री केली जात आहे तसेच मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांची संख्या सुद्धा अधिक असल्याचे समजले आहे. या व्यवसायिकाकडून लाखोंचा मलिदा दरमहागोळा केला जात असल्याची समजते.
                     शिरूर पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्यांवर या व्यवसायिकाकडून दर महा मलिदा गोळा करण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे समजते आहे. वसुली बहाद्दर यांचा पूर्ण महिना वसुली करण्यातच जात असल्याचे दिसते आहे. पगार शासनाचा काम मात्र मलिदा गोळा करण्याचे असे काम पोलीस ठाण्यात चालू असल्याची चर्चा पोलीस ठाण्यात होत आहे. या वसुली बहाद्दरावर वरिष्ठांचा आशीर्वाद  जरा जास्तच असल्याचे दिसत आहे.
                   या पोलीस चौकीच्या हद्दीत आमदाबाद फाट्यापासून ते जांबुत, मलठण,कवठे यमाई,तांदळी, चांडोह  अशा अनेक भागांमध्ये सुमारे 15 ते 20 धाब्यावर अवैध दारू विक्री केली जाते तर सात ते आठ ठिकाणी अवैध हातभट्टी दारू विक्री केली जाते. या व्यवसायिकांकडून  सपोनि,पोऊनि, यांच्यासह चौकी येथील कार्यरत पोलीस कर्मचारी  व वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत दरमहा वेगळा रेट असल्याची चर्चा बेट भागात होत आहे.
                    या भागातील सुरू असलेले अवैध व्यवसाय बंद करून  पोलीस अधीक्षक यांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
                   शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहरासह पोलीस चौकीच्या हद्दीतील सुरू असलेल्या अवैध व्यवसायांची यादी  व अवैध व्यवसायिकाकडून घेण्यात येणारे दरमहा चे दर पत्रक जागृत शोध वृत्त पत्राकडे असून दरमहा होणारी उलाढाल आकडेवारीसह पुढील भागात  (क्रमशः)