Ads
Ads

एक लाखा पेक्षा जास्त मागासवर्गी्यांच्या नौकऱ्या गेल्या चोरीला

एक लाखा पेक्षा जास्त मागासवर्गी्यांच्या नौकऱ्या गेल्या चोरीला

धाराशिव (प्रतिनिधी प्रमोद मुरेकर) :- खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेच्या आधारे भरती झालेल्या शिक्षक कर्मच्यार्याचां OBC, VJ-NT, SBC, SC, ST या राखीव जागेवर स्थांलातरीत केल्यामूळे रोस्टर तपासणी हि निवड सुची प्रमाणे करणे बाबत.

महाराष्ट्रामध्ये OBC, VJ-NT, SBC, SC, ST या प्रवर्गातील शिक्षक/ कर्मचाऱ्यांच्या रोस्टर तपासणी हि निवड सुची प्रमाणे करणे गरजेचे आहे कारण खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेच्या आधारे निवड झालेल्या शिक्षक/कर्मच्याऱ्यांना राखीव जागेवर बेकायदेशीर रित्या स्थलातंरीत करण्यात आले आहे. त्यामुळे OBC, VJ-NT, SBC, SC, ST यांचे एक लाखापेक्षा जास्त नौकरीच्या जागा चूकीच्या पध्दतीने भरून खूप मोठा अन्याय केला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्हयाची परस्थीती अभ्यासल्या नंतर सबळ पुरावे हाती आले आहे.
त्या करीता तात्काळ निवड सुची प्रमाणे रोस्टर तपासणी होणे आवश्यक आहे. आपल्या धाराशिव जिल्हा परीषद मध्ये सुध्दा माहीतीच्या आधीकारामार्फत निवड सुची व रोस्टर संबंधी माहिती मागवली असता दोन महिन्या पासून टाळाटाळ करत आहेत.
योग्य पध्दतीने रोस्टर तपासनी केली तर एक ते दिड लाख नौकऱ्या OBC, VJ-NT, SBC, SC, ST या प्रवर्गासाठी उपलब्ध होतील. या विषयी आपल्या स्थरावर तात्काळ कारवायी करून मागास्वर्गीय बांधवास न्यय देण्यात यावा. अन्यथा आमरण उपोशण तथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.

या संबंधि आज जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबाना निवेदन देण्यात आले.

उपस्थित सर्व ओबीसी बांधव.