Ads
Ads

गुन्हेगारांनो सावधान! शिरूर पोलिसांचा ‘ऍक्शन प्लॅन ’; २१ कोटींचे ड्रग्ज जप्त तर अनेक गुन्हेगार केले तडीपार! गुन्हेगारांवर आता सीसीटीव्हीचा वॉच!

गुन्हेगारांनो सावधान! शिरूर पोलिसांचा ‘ऍक्शन प्लॅन ’; २१ कोटींचे ड्रग्ज जप्त तर अनेक गुन्हेगार केले तडीपार! गुन्हेगारांवर आता सीसीटीव्हीचा वॉच!

शिरूर (प्रतिनिधी ) शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, गेल्या वर्षभरात गुन्हेगारी टोळ्यांपासून ते अमली पदार्थ तस्करांपर्यंत सर्वांवर जोरदार प्रहार करण्यात आला आहे. आगामी काळात शहरातील सीसीटीव्ही नेटवर्क वाढवून गुन्हेगारांवर ‘तिसरा डोळा’ ठेवला जाणार असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘निर्भया पथक’ अधिक सक्षम करण्याचा निर्धार केंजळे यांनी व्यक्त केला आहे.

       पोलिसांनी अमली पदार्थांच्या विरोधात राबविलेल्या मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. एम.डी. ड्रग्सच्या ५ केसेसमध्ये तब्बल २१ कोटी रुपयांचा साठा जप्त करून १० आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. तसेच, अवैध Image अग्निशस्त्रांविरोधात राबविलेल्या शोधमोहिमेत १६ गावठी पिस्तुले आणि २३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून २३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

                 पोलीस ठाण्याच्या हद्दीतीत वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर मोठी कारवाई करत त्यांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलिसांनी संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मिनी मोक्का) कारवाई सुरू केली आहे. शहरातील जुगार चालवणारी हबीब सय्यद टोळी आणि चोरी करणाऱ्या टोळ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १११ व ११२ नुसार कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच रेकॉर्डवरील  १६ गुन्हेगारांना पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले असून, अन्य ७ गुन्हेगारांवर तडीपारीची प्रक्रिया सुरू असून  पुढील काळात वारंवार गुन्हे करणाऱ्या वर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

        वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिरूर वाहतूक शाखेने  चांगलाच दणका दिला Image असून शहरातील शिस्त राखण्यासाठी पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा धडाका लावला आहे. त्याचबरोबर बुलेटमधून कर्कश आवाज काढणाऱ्या ३५ वाहनांचे सायलेन्सर जप्त करून त्यावर रोडरोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले. विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट आणि ब्लॅक फिल्म असलेल्या हजारो वाहनांवर कारवाई करून सुमारे १.४० कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला असल्याचे केंजळे यांनी सांगितले.

               महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक अधिक सक्रिय करण्यात येत आहे. "आम्ही प्रत्येक गावातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन जनजागृती अभियान राबवणार आहोत," असे संदेश केंजळे यांनी सांगितले. तसेच, शहरातील गुटखा विक्री थांबवण्यासाठी टपरी धारकांची चौकशी करून कठोर कारवाई केली जाणार आहे.

            शिरूर शहरातील इंदिरा गांधी पुतळा परिसरातील मध्यबिंदूवर पोलिसांचा विशेष नजर  राहणार आहे. तसेच धाबा व हॉटेल वर अवैध दारू विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारीं आल्या असून त्याची दखल घेऊन अशा धाबा व हॉटेलवर धडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस निरक्षक संदेश केंजळे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली.