Ads
Ads

केंद्रात राज्यात भाजपची सत्ता आहे शिरूर नगरपालिकेची सत्ता दिल्यास शिरूरचा कायापालट करू - चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य

केंद्रात राज्यात भाजपची सत्ता आहे शिरूर नगरपालिकेची सत्ता दिल्यास शिरूरचा कायापालट करू - चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य

 

 शिरूर (प्रतिनिधी ) - केंद्रात व राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन मी आलो आहे शिरूर नगरपालिकेची सत्ता दिल्यास शिरूर चा विकास आराखडा तयार करून शिरूरचा कायापालट केला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यांच्या हस्ते  शिरूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

                    मार्केट यार्ड येथील  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. तेथून भव्य दिव्य अशा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तेथून पदयात्रा सुरू होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. पदयात्रा ही संपूर्ण पालखी मार्गाने सुरू शहरात जात असताना शिरूरकरांचा चांगला प्रतिसाद पदयात्रेस मिळत आहे.

                    यावेळी भाजपा शहर अध्यक्ष नितीन पाचर्णे यांनी शिरूर शहरातील विविध प्रश्न सोडविण्याची मागणी निवेदणाद्वारे केली आहे.

               चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की,हुडको कॉलनी संदर्भातील वर्ग दोनची  निर्णय घेण्यात येईल. हुडको कॉलनीचे पुढील काही महिन्यात प्रॉपर्टी कार्ड करण्याचा निर्णय होईल असे सांगून गुजर मळ्यातील खेळाच्या मैदानाचा असलेल्या आरक्षणा संदर्भातील प्रश्न मार्गी लावण्यात येईल तसेच स्टेट बँक कॉलनी  येथील खेळाच्या मैदानाच्या आरक्षणासंदर्भातला प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

             

यावेळी आमदार महेश लांडगे, पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष प्रदीप कंद,जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पलांडे, भाजप तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे, धर्मेंद्र खांडरे, जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष संजय बारवकर, भाजप शहराध्यक्ष नितीन पाचर्णे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा राजेंद्र लोळगे भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, जिल्हा सरचिटणीस आबासाहेब सरोदे यांच्यासह मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.