मोबाईलवर फोटो, देहव्यापाराचा डाव; भारती विद्यापीठ पोलिसांचा दलालावर घाव!
पुणे,प्रतिनिधी (भगवान श्रीमंदिलकर )
मोबाईलवर महिलांचे फोटो पाठवून ग्राहकांना आमिष दाखवत देहव्यापारासाठी तरुणींची निवड करून देणाऱ्या दलालावर भारती विद्यापीठ पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत दोन परराज्यातील तरुणींची सुटका करण्यात आली असून मुख्य दलालाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कात्रज परिसरातील एका लॉजमध्ये सापळा रचण्यात आला. आरोपी मोबाईलवरील व्हॉट्सअॅपद्वारे महिलांचे फोटो ग्राहकांना पाठवून त्यांच्याकडून देहव्यापाराचा व्यवहार घडवून आणत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या बनावट ग्राहकाच्या माध्यमातून पुरावे गोळा करून छापा टाकण्यात आला.
कारवाईदरम्यान दोन परराज्यातील पीडित तरुणींची सुरक्षित सुटका करण्यात आली. याप्रकरणी दलाल
तुकाराम दत्ता मनाळे (वय २२) याला अटक करण्यात आली असून त्याच्यासह इतरांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली


