पुणे येथील शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य नामांकित महाविद्यालय नौरोसजी वाडिया महाविद्यालयातील कार्यरत कर्मचारी, साहित्यिक, कवी, श्री दिनेश ताराचंद खैरे. यांना पुणे येथील साऊ ज्योती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व पारसनाथ फाउंडेशनच्यावतीने महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रतिष्ठित समजला जाणारा पुरस्कार आहे.
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यावर्षीचा 2025 चा पुरस्कार नौरोसजी वाडिया
महाविद्यालयातील कार्यरत कर्मचारी, साहित्यिक , कवी श्री दिनेश खैरे. यांनी साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा देऊन गौरवण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला क्रीडा,विज्ञान, उद्योग इत्यादी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान समाजासाठी केलेले विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना
प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अशी माहिती साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सचिन हळदे यांनी दिली. साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींच्या कार्याचा सन्मान सोहळा भारत इतिहास संशोधन मंडळ सदाशिव पेठ पुणे येथे दिनांक 23 मार्च रोजी नुकताच संपन्न झाला.
या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून मा. प्रिया थोरात ( असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस क्राईम ब्रँच मुंबई ) कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रामजीत गुप्ता (चीप इन्वेस्टीगेशन ऑफिसर मुंबई) प्रमुख मार्गदर्शक श्री संतोष जाधव ( कवी अभिनेता) आम्रपाली पारखे (कवयित्री) प्रवीणताई पानसरे ( भूमाता महिला संघटना पुणे) प्रमुख आकर्षण चित्रा दीक्षित (अभिनेत्री) प्रमुख उपस्थिती मा. संगीता ढोले (महाराष्ट्र पोलीस संचालिका) डॉ. अंजना खताळ
(महाराष्ट्र राज्य शिक्षण सल्लागार) मा. नीलिमा पाटील मॅडम (संस्थेच्या उपाध्यक्ष) ॲड. नीता शेळके (उच्च न्यायालय नागपूर) इत्यादी मान्यवर खास करून या कार्यक्रमास उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते श्री दिनेश ताराचंद खैरे. यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
साहित्यिक ,कवी,श्री दिनेश ताराचंद खैरे हे मितभाषी,मृद स्वभावाचे, सेवा कार्यतत्पर,कवी लोकसाहित्य म्हणून सुपरिचित आहेत. सांस्कृतिक, अध्यात्मिक अशा सर्व क्षेत्रात त्यांचा वावर आहे. त्यांची दोन पुस्तके सुद्धा प्रकाशित आहेत. यापूर्वी त्यांना अनेक राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांचे अनेक मानसन्मान सोहळे झाले आहेत.श्री दिनेश खैरे यांना मॉर्डन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मा. प्रा.श्री सचिन सानप (सर), नोरोसजी वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्री वसंत चाबुकस्वार(सर),प्रबंधक, श्री राजेंद्र तागडे(सर),डॉ. श्री. लक्ष्मण चौधरी
(सर), डॉ.श्री अशोक उबाळे (सर) सहसंचालक(उच्च शिक्षण) विभाग पुणे, डॉ. अर्चना बोऱ्हाडे (मॅडम) प्रशासन अधिकारी(उच्च शिक्षण )विभाग पुणे. श्री अरविंद भागवत सर,श्री माणिक मुंडे सर,श्री बाळासाहेब पोटे सर,श्री विनायक चव्हाण सर,श्री विजय सावरतकर सर,माजी गटशिक्षणाधिकारी श्री ए.बी. पाटील सर,प्रा.सौ संजीवनी पाटील (मॅडम),श्री नामदेव गवळी सर,श्री सुरेश पाटील सर,श्री राजाराम साधले सर,श्री देवदास जामदार गुरुजी,श्री शिवाजीराव हराळे मास्तर, श्री सतीश गोगावले,श्री राम यादव सर,आदींचे मार्गदर्शन लाभले.योगेशजी दाते सर यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


