Ads
Ads

मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करावे – बाळासाहेब म्हस्के तहसीलदार

मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करावे – बाळासाहेब म्हस्के तहसीलदार

शिरूर (भगवान श्रीमंदिलकर ) - 

             "लोकशाही सुदृढ आणि पारदर्शक ठेवण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव अचूक मतदार यादीत असणे अत्यंत गरजेचे आहे. शिरूर तालुक्यातील एकही नागरिक मतदार नोंदणीपासून किंवा यादीतील दुरुस्तीपासून वंचित राहू नये, यासाठी निवडणूक प्रशासन कटिबद्ध आहे. मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी नागरिकांनी आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) पूर्ण सहकार्य करावे," असे आवाहन शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या वाढीव कालावधीचा तालुक्यातील सर्व पात्र नागरिकांनी, नवमतदारांनी व महिलांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे निर्देशही तहसीलदार म्हस्के यांनी दिले.

              सुधारित वेळापत्रकानुसार तालुक्यातील बीएलओ Image अधिकारी ३० जून ते १७ ऑगस्ट दरम्यान घरोघरी जाऊन पडताळणी करत आहेत. अनेकदा मतदारांच्या पत्त्यांची माहिती अपुरी किंवा संक्षिप्त स्वरूपात नोंदवलेली असते, ज्यामुळे बीएलओंना शोध घेणे कठीण जाते. त्यामुळे ज्या मतदारांच्या पत्त्यांमध्ये त्रुटी किंवा अपूर्णता आहे, त्यांनी स्वतःहून आपल्या भागातील बीएलओशी संपर्क साधून 'एन्युमरेशन फॉर्म' भरून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

         आपल्या क्षेत्रातील बीएलओ अधिकारी कोण आहेत व त्यांचा संपर्क क्रमांक काय आहे, हे जाणून घेण्यासाठी नागरिक पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या pune.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ देऊन अधिक माहिती घेण्याचे आवाहन तहसीलदार यांनी केले.