Ads
Ads

अशोक पवारांच्या विरोधात माऊली कटके हाथी घड्याळ बांधणार ! महाकालचा आशीर्वाद कोणाला मिळणार !

अशोक पवारांच्या विरोधात माऊली कटके हाथी घड्याळ बांधणार ! महाकालचा आशीर्वाद कोणाला मिळणार !
शिरूर(प्रतिनिधी):- 
    कालच विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांचा बैठकींचा धडाका सुरू झाला आहे. निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच होणार आहे.दोन्ही आघाड्यांमध्ये प्रत्येक प्रमुख तीन तीन पक्ष आहेत जो तो पक्ष अधिक जागा मिळविण्यात व्यस्त आहे शिरूर हवेली विधानसभेचा विचार केला तर विद्यमान आमदार अशोक पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवार गटाला जाऊन अशोक पवार हे उमेदवार म्हणून निश्चित मानले जात आहे.
अशोक पवार यांच्या विरोधात महायुतीतून भाजपाने दावा केला असून त्यांच्याकडे जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे इच्छुक आहेत तर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे त्यांच्याकडून जि प माजी सदस्य माऊली कटके हातात घड्याळ बांधून निवडणूक लढवण्यास तयार आहे माऊली कटके यांनी मागील सहा महिन्यापासून मतदारसंघात सक्रिय झाले आहेत त्यांनी महाकाल (उज्जेन)मोफत यात्रेचे यशस्वी नियोजन करून सुमारे 20 ते 25 हजार भाविकांना मोफत दर्शन घडवले आहे सुमारे 6 टप्प्यांमध्ये या यात्रेचे नियोजन करण्यात आले होते या यात्रेच्या माध्यमातून माऊली कटके हे मतदार संघामध्ये पोहोचले आहेत. तसेच आयोध्या यात्रेचे ही नियोजन सुरू असल्याचे बोलले जात आहे. या मोफदर्षण यात्रेच्या माध्यमातून माऊली कटके यांनी मतदार संघात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या विरोधात विरोधकांनी चांगली मोट बांधली असून बंद पडलेला कारखाना व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
अशोक पवार विरुद्ध माऊली कटके सामना झाल्यास लढत अटी तटी ची होऊ शकते.शरद पवार यांना  मिळणारी सहानुभूती अशोक पवार यांना तारणार का माऊली कटके यांना महाकालचा  आशीर्वाद मिळणार हे लवकरच कळेल मात्र सध्याच वातावरण पाहता माऊली कटके यांना प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसते.