Ads
Ads

पुणे पोलिसांची मोठी कारवाई : अवैध हुक्का फ्लेवरचा ₹2.85 लाखांचा साठा जप्त; दोघे ताब्यात

पुणे पोलिसांची मोठी कारवाई : अवैध हुक्का फ्लेवरचा ₹2.85 लाखांचा साठा जप्त; दोघे ताब्यात

पुणे, (प्रतिनिध ) -  पुणे शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-१ ने अवैध तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरच्या विक्रीवर मोठी कारवाई करत तब्बल ₹2,85,410 किमतीचा साठा जप्त केला असून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कोंढवा येथील कौसरबाग परिसरातील अर्बन बाईट्स हॉटेलच्या मागे असलेल्या मदिना डेली नीड्स दुकानाच्या पत्र्याच्या शेडमध्ये विविध कंपन्यांच्या अवैध तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरचा मोठा साठा ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार १ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून कारवाई केली.

या कारवाईत लतीफ लाल शेख (वय ६२, भवानी पेठ, पुणे) आणि नवाज अरमानखान पठाण (वय २६, कोंढवा, पुणे) Image यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांच्या अवैध तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरचा ₹2.85 लाखांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-१ ने वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पाडली. या मोहिमेत पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेत अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात प्रभावी कारवाई केली.

पुणे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात अवैध अमली पदार्थ, तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर किंवा तत्सम बेकायदेशीर साठा अथवा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले.

Image Image