प्रभागातील मतदारांनीच निवडणूक हाती घेतल्याने विजय निश्चित - स्वप्नाली योगेश जामदार
शिरूर ( प्रतिनिधी ) - प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आजपर्यंत सामाजिक भावनेतून आतापर्यंत प्रयत्न आले. रक्तदान शिबिर,आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरणाचे काम आता पण करण्यात आले.
प्रभागातील नागरिकांची मोठा जनसंपर्क असून प्रभागातील माता,भगिनी,महिला,बंधू प्रचार रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. प्रभागातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवून प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी व्यक्त केले.
प्रभागातील नागरिक स्वयंस्फूर्तीने प्रचार रॅलीमध्ये सहभागी होत आहे. सर्व समाजातील माता-भगिनींचा प्रचंड सहभागी होत आहेत. याच बळावर आपण या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ असा विश्वास वाटतो. या निवडणुकीच्या माध्यमातून मला जर संधी
मिळाली त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य पर्यंत पोहोचविण्याचे काम यांच्या माध्यमातून करण्यात येईल.
प्रभागातील समस्यांचे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन नागरिकांसाठी विविध उपाय योजना राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरणाचे काम आम्ही हातात घेतला आहे. माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वचनबद्ध रावण काम करण्यात चा माणस त्यांनी यावेळी व्यक्त केला.


