Ads
Ads

प्रशांत डिक्कर यांचा बैल बंडीतुन उमेदवारी अर्ज दाखल.

प्रतिनिधी प्रमोद मुरेकर 
जळगाव/ ( दि.२८ ) परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह एस डी ओ कार्यालयावर धडक देत चक्क बैल बंडीतुन नामांकन अर्ज दाखल केला आहे. कोणाला गाडी पाठवली नाही. भाड्याला पैसे दिले नाही, कोणालाही खर्च न देता, स्वखर्चाने आलेल्या हजारो सहकाऱ्यांसह अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करतांना शासनाला डिपॉजीत देण्याकरिता कार्यकर्त्यांनी ताबडतोब लोकवर्गणी जमा करित शासनाकडे सुपुर्द करण्यात आली. प्रशांत डिक्कर यांची उमेदवारी दाखल झाल्याने विरोधक चांगलेच बेचैन आहेत. मागिल विधानसभेच्या झालेल्या चार निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत विरोधकांचे गणित चुकले असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांवर दबाव आणुन अधिकाऱ्यांनी प्रशांत डिक्कर यांची जळगाव येथील आजची सभा नाकारली. मतदार संघातील जनतेवर दबावाचे राजकरण होत आहे. हे Image स्पष्ट झाले आहे. भाजपाचे उमेदवार संजय कुटे यांच्या पायाखालची वाळु सरकली. त्यामुळेच भाजपच्या उमेदवारांना सभेसाठी मजुरीने माणसं आणावे लागलेत हे २० वर्ष आमदारकी भोगुन त्यांचं दुर्दैव आहे. यावेळी मतदार संघातील शेतकरी शेतमजूरांमधे सरकार बद्दल प्रचंड नाराजी असल्याने प्रशांत डिक्कर यांची आजची उमेदवारी महत्त्वपूर्ण ठरेल. प्रशांत डिक्कर यांची आर्थिक परिस्थिती शुन्य असली तरी त्यांचा शेतकरी शेतमजूरांसाठी १६ वर्षांपासून केलेला संघर्ष प्रशांत डिक्करांसाठी लाभदायक ठरेल अशी एकंदरीत मतदारांमधे चर्चा ऐकायला मिळत आहे. मा.संभाजी राजे,मा.खसदार राजु शेट्टी,माजी मंत्री बच्चु कडु यांनी परिवर्तन महाशक्ती आघाडीतुन प्रशांत डिक्कर यांना दिलेली उमेदवारी लाभदायक ठरेल असल्याचे सांगितले जात आहे.

Image