Ads
Ads

रसिक भाऊ धारिवाल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महारक्तदान शिबीरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद!तब्बल १७१९ रक्तदात्यांनी रक्तदान करून केला उच्चांक!

रसिक भाऊ धारिवाल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महारक्तदान शिबीरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद!तब्बल १७१९ रक्तदात्यांनी रक्तदान करून केला उच्चांक!

शिरूर (प्रतिनिधी)- 

उद्योगपती स्व.रसिकलाल माणिचंद धारिवाल यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त येथील शिरूर नगरपरिषदेच्या मंगल कार्यालयात आयोजीत करण्यात आलेल्या महारक्तदान शिबीरात उत्स्फूर्तपणे तब्बल १७१९ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.सहभागी रक्तदात्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने ८७ जणांना सायकलींचे तसेच प्रत्येक सहभागी रक्तदात्यास आकर्षक ट्रव्हलिंग बॅग भेट देण्यात आली.

शिबिराचे उद्घाटन उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल,दिनाभाभी धारिवाल,युवा उद्योजक आदित्य धारिवाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्व.रसिकलाल धारिवाल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आले.

       स्व.रसिकलाल माणिचंद धारिवाल यांच्या जयंतीनिमित्त पी.आर.धारीवाल फाऊंडेशन व उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर घेण्यात आले.

या शिबिरास डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांनी भेट दिली.

यावेळी नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे,उपनगराध्यक्ष मितेश गादिया,जिल्हा नियोजन समितीचे राहुल पाचर्णे,पंचायत समिती सभापती स्वाती घावटे,जिल्हा परिषद सदस्य सुजाता पवार,जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे,शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक रविंद्र ढोबळे,माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण,नगरसेवक अभिजीत पाचर्णे, बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव,पाणी पुरवठा समितीचे सभापती डॉ.सुनीता पोटे,महिला व बालकल्याण समिती सभापती आयेशा सय्यद,उपसभापती स्वप्नाली जामदार,नियोजन व विकास गृहनिर्माण समिती सभापती स्वाती साठे,स्वच्छता व आरोग्य समिती सभापती एजाज बागवान, उद्योजक विनोद धाडीवाल, प्रवासी संघाचे अनिल बांडे यांसह आजी माजी नगरसेवक नगरसेविका तसेच आयोजक पी.आर.धारीवाल फाऊंडेशन व उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.केईएम ब्लड बँक,रुबी हॉल ब्लड बँक,अक्षय ब्लड बँक,ओम ब्लड बँक,आनंद त्रुषी ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले.

      शिरूर नगरपरिषदेेच्या मंगलकार्यालयात आयोजीत शिबीर रविवार दि.२९ रोजी सकाळी सुरू करण्यात आले.रक्तदात्यांनी सकाळपासुनच उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबीरात सहभाग घेत १७१९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.सामाजिक भावनेतून सर्व रक्तदात्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने ८७ रक्तदात्यांना सायकल वाटप करण्यात आले तसेच प्रत्येक सहभागी रक्तदात्यास प्रमाणपत्र,एक भेटवस्तू म्हणून बॅग देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रस्ताविक माजी नगरसेवक विजय दुगड यांनी सुत्रसंचालन सुशांत कुटे तर आभार प्रशांत शिंदे यांनी मानले.