राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार माऊली कटके यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज
2024-10-30 04:53:26
शिरूर (प्रतिनिधी )- शिरूर हवेली विधानसभा निवडणुकी करिता महायुतीकडून अजित पवार गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी दिनांक 29 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल केला असून अर्ज भरताना काढलेल्या रॅलीमध्ये विरोधकांना घाम फोडणारी झालेले गर्दी आणि पाच कंदील चौकामध्ये झालेली सभा गर्दीच्या उंच उच्चांकाने चांगलीच गाजली.
शिरूर हवेली विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडीच्या बाजूने झुकणारी असल्याचे बोलले जात असताना महायुतीकडून करण्यात आलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे महाविकास आघाडीचे
उमेदवार अशोक पवार यांच्यासमोर माऊली कटके यांचे तगडे आव्हान उभे टाकले आहे महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान आमदार अशोक पवार यांना उमेदवारी जाहीर होऊन त्यांनी उमेदवारी अर्ज देखील शक्ती प्रदर्शन करीत अगोदर दाखल केला आहे. उमेदवारीसाठी भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात रसिकेत सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाकडून राष्ट्रवादी अजित पवार गट गटात प्रवेश केलेले ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली यानंतर महायुतीचे अनेकांनी नाराजी व्यक्त करून बंडखोरीच्या हत्यार उपसले यामध्ये वाघोलीचे माजी उपसरपंच व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शांताराम कटके यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला तर भाजपचे शिरूर विधानसभा निवडणूक समन्वयक प्रदीप कंद यांनी देखील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन शेवटच्या दिवशी
भाजप कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे दोन उमेदवारांच्या बंडखोरीमुळे माहिती पुढे टेन्शन वाढले असताना महायुतीचे अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळालेले माऊली कटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीकडून करण्यात आलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
माऊली कटके यांनी कार्यकर्त्यांसह सकाळी वाघोली येथील वाघेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिरूरच्या दिशेने आगे कूच केली वडू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी नतमस्तक होऊन पुढे जात असताना महामार्गावरील सर्वच मोठ्या गावांमध्ये कटके यांची जोरदार स्वागत करण्यात आले शिरूर येथील माजी आमदार
बाबुराव पाचरणे स्मृतीस्थळाला वंदन करीत मार्केट कमिटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून राहिलेला सुरुवात झाली. शिरूर शहरातील विविध प्रार्थना स्थळांना भेटी देण्यात येत आशीर्वाद घेतले.मा ना.दिलीप वळसे पाटील, राजेंद्र जासूद, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,भाजप चे नेते राहुल दादा पाचर्णे ,शशिकांत दासगुडे,दादा पाटील फराटे, रवी बापू काळे,राजेंद्र जगदाळे,सुनिल जाधव, मयूर थोरात,संपत गाडे, सुधीर फराटे,स्वप्नील रेड्डी,किरण झंजाड,शिरूर ग्रामीणचे सरपंच विठ्ठल घावटे,आबासाहेब सरोदे,सरदवाडीचे मा सरपंच विलास कर्डीले,कर्डेलवाडीचे सरपंच राजेंद्र दासगुडे,सोन्याबापू दासगुडे,उमेश शेळके , शिरूर पंचक्रोशीतील सरपंच, माजी सरपंच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट भाजप शिवसेना शिंदे गट पदाधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये पाच कंदील चौक येथे झालेल्या सभेत कटके यांच्या विजेचा संकल्पना करण्यात आला संकल्पना संकल्प
करण्यात आला महायुतीने एकत्रित येऊन माऊली कटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे विरोधकांना घाम फोडला आहे आगामी निवडणूक हलकी नाही तर घासून होणार असल्याचे स्पष्ट संकेत यावेळी मिळाले आहे.