साई सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन कडून गरजूनाची दिवाळी गोड
2024-10-30 15:28:19
चिंचवड ( प्रतिनिधी )-प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही, साई सोशल स्पोर्ट्स फाउंडेशनने २०२४ च्या दिवाळीत गरजूंचे जीवन उजळले. २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी दिघी, आळंदी आणि पिंपरी येथील गरजू लोकांना साड्या, फराळाचे पदार्थ आणि मिठाईचे बॉक्सचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला मास्टरमाइंड ग्लोबल स्कूल, भोसरी यांचे सहकार्य लाभले, जे झोपडपट्टीतील मुलांना मोफत इंग्रजी शिक्षण देतात. फाउंडेशनतर्फे १५० साड्या, २५० मिठाईचे बॉक्स आणि लहान मुलांसाठी वेफर्सचे वाटप करण्यात आले.
हा मदतीचा कार्यक्रम साई सोशल स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष फिरोज खान आणि त्यांच्या सहकारी सदस्य डॉ. प्रदीपा नायर, दिपाली खामार, कमलेश स्वामी, पारुल गुप्ता, स्नेहल तांबोळी, पल्लवी वैद्य यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे यशस्वी झाला.