महाविकास आघाडी विरोधात विस्कटलेली महायुतीतील भाजपा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ठाकले एकमेकांच्या विरोधात!
शिरूर ( प्रतिनिधी ) - शिरूर नगरपरिषद निवडणूकित मोठ्या घडामोडी होताना दिसत आहेत. माहितीतील घटक पक्ष असलेले शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपापल्या पक्षाचे स्वतंत्र पॅनल टाकत उमेदवार उभे केले आहेत. तर महाविकास आघाडीने मात्र सर्व घटक पक्ष एकत्र येत आपले उमेदवार दिले आहेत.
महाविकास आघाडी तर्फे नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्यावतीने अलका सुरेश खांडरे यांना उमेदवारी दिली तर भाजपाने माजी नगराध्यक्ष सुवर्णा राजेंद्र लोळगे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी नगरसेवक अभिजीत पाचर्णे यांच्या पत्नी ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांना उमेदवारी दिली आहे. सर शिवसेनेने माजी नगरसेविका रोहिणी किरण बनकर यांना उमेदवारी दिली आहे. तर माजी नगराध्यक्ष वैशाली वाखारे व माजी नगरसेविका मनीषा कालेवारी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
शिरूर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदी इतर मागासवर प्रवर्ग महिलांसाठी राखीव असल्याने अनेक उमेदवार पदासाठी इच्छुक होते तसेच या निवडणुकीत 12 प्रभागापासून प्रत्येक प्रभागांमध्ये दोन नगरसेवक म्हणजे 24 नगरसेवक अधिक जनतेतून नगराध्यक्ष निवडून द्यायचे आहेत.
महा विकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने 24 उमेदवार व एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला आहे. महायुतीतील भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवार उतरवले आहेत तर शिवसेनेने मात्र नगराध्यक्ष पदा सह ते आठ ठिकाणीच आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.
शिरूर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर नगरसेवक पदासाठी 165 उमेदवारांनी 193 अर्ज दाखल केली होती यातील 165 उमेदवारांचे 188 उमेदवारी अर्ज वैद्य ठरविण्यात आले असून पाच अर्ज हे अवैध ठरवण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळविली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी मातब्बर उमेदवारांमध्ये लढत होत असून सर्वच उमेदवार हे तुल्यबळ असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिनांकापर्यंत कोण कोण उमेदवार आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतील हे पाहणे गरजेचे आहे.


