शिरूर शहराच्या सर्वांगीण विकास करून आदर्श नगरपरिषद बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या - अजित दादा पवार उपमुख्यमंत्री
शिरूर (प्रतिनिधी ) - शिरूर शहराच्या सर्वांगीण विकास करून आदर्श नगरपरिषद बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केले. ते शिरूर नगरपरिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या अभिजित पाचर्णे व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ पाच कंदील चौक शिरूर येथे आयोजित जाहीर बोलत होते.
यावेळी आमदार माऊली कटके, माजी मंत्री दिलिप वळसे पाटील, म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवि काळे, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे, आदी उपस्थित होते.
शिरूर नगरपरिषदेत आम्ही उद्योगपती
प्रकाश धारिवाल यांच्या शिरूर शहर विकास आघाडी बरोबर निवडणुकीस सामोरे जायचो. मी यात कधी ही हस्तक्षेप केला नाही. काही जण चुकीचे सांगतात की आघाडी मध्ये अजित पवार यांनी जादा जागा राष्ट्रवादीला मागितल्या. प्रकाश धारिवाल यांनी मला स्पष्ट पणे सांगितले होते की माझ्या व्यवसायामुळे मी निवडणुक लढविणार नाही.तसेच महाविकास आघाडी नगरपालिका निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
शिरूर नगरपरिषद नवीन इमारती साठी निधी उपलबद्ध करून दिला तसेच क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गीहि मार्गी लावण्याचे ही आश्वासन त्यानी दिले. शिरूर शहराचा हद्दी वाढीचा पश्न सर्वांना विश्वासात घेवून निकाली काढण्यात येईल असे ही पवार म्हणाले.शिरूरची बाजारपेठ चांगली असली पाहिजे असेहि पवार म्हणाले.
कायदा व सुव्यवस्था चांगली पाहिजे. कोणी ही जर कायदा हाती घेण्याचा प्रयत्न केला. कोणी
दादागिरी करत असेल तर त्याला सोडणार नाही तो कोणीही मोठ्या बापाचा असो आमच्या जवळचा असो अथवा लांबचा असो त्याला सोडणार नाही. आमच्या कडे सगळ्यांना न्याय समान असणार असल्याचा इशारा देत दहशत खपवून घेतली जाणार नाही असे पवार म्हणाले.शिव शाहू फुले व आंबेडकर यांचे विचार पुढे घेवून आम्ही जात आहोत.सर्वसामान्याच्या उत्कर्षा साठी शासन काम करीत आहे. महिलांसाठी विविध योजना शासनाने आणल्या आहेत. शिरूर शहर हे मोठ्या झपाट्याने वाढत आहे. शिरूर शहरा लगत सुपा, कारेगाव, कर्डे,रांजणगाव असा चार औद्योगिक वसाहती वेगाने विस्तारत आहे. शिरूर शहर हे वाढत आहे. वाढत्या शहरीकरणाचा वेग लक्षात घेता शहराचा नियोजनबद्ध विकास होणे गरजेचे आहे.
शिरूर शहराचा कचराचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.त्याच बरोबर शिरूर शहर हे
शैक्षणिक केंद्र कसे बनेल या दृष्टीने काम करु असे ते म्हणाले. अहिल्यानगर ते पुणे या रस्त्याचे कामाची निविदा निघाली असून काम लवकरच सुरु होईल. असे पवार यांनी सांगितले.
यावेळी आमदार माऊली कटके, माजी मंत्री दिलिप वळसे पाटील, म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवि काळे, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे, आदी सह सर्व उमेदवार यांच्यासह मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.


