Ads
Ads

राज्यस्तरीय वृक्षमित्र पुरस्काराने दिनेश खैरे सन्मानित.

 अहिल्यानगर ( प्रतिनिधी ) -

राज्यातील साहित्य क्षेत्रातील बहुआयामी बहुनामांकित,सर्वत्र चर्चिला जाणारा तेजस बहुउद्देशीय सामाजिक संस्था नाशिक यांच्यावतीने सर्व क्षेत्रातील निवडक राजकीय , सामाजिक,शैक्षणिक, क्रीडा कला,सांस्कृतिक ,धार्मिक अध्यात्मिक ,आरोग्य तसेच कवी, लेखक ,संपादक ,शिक्षक, ग्रामसेवक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांमधून बोटावर मोजता येतील असे बहुविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात.संभाजीनगर येथील तेजस फाउंडेशन या संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा राजश्री शाहू महाराज स्मारक सभागृह दसरा चौक ,कोल्हापूर. येथे नुकता संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती मा.श्री अशोक कपूर,( सिने अभिनेता व दिग्दर्शक )मुंबई, लोकशाहीर मा.श्री सुरेशभाऊ डोळस,(ज्येष्ठ साहित्यिक ज्येष्ठ सिने अभिनेते) पुणे,  मा. श्री.मेघराज भोसले (अध्यक्ष अ.भा.मराठी चित्रपट महामंडळ ) पुणे, मा. कुमुदिनी मधाळे (कवी, लेखिका, गीतकार, सिनेअभिनेत्री ) कोल्हापूर , मा. श्री कृष्णकांत पाटील(पत्रकार, कनेगाव ) तेजस फाउंडेशनच्या अध्यक्षा मेघाताई डोळस,कवी लेखक श्री महेंद्र तुपे( कवी ,लेखक) इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

2025 चा सामाजिक साहित्य क्षेत्रातील राज्यस्तरीय वृक्षमित्र  पुरस्कार , पुणे येथील नामांकित शिक्षण संस्था नौरोसजी वाडिया महाविद्यालयातील कार्यरत असणारे कर्मचारी नवोदित कवी लेखक श्री दिनेश ताराचंद खैरे यांना नुकताच सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.श्री दिनेश खैरे हे मितभाषी,मृद स्वभावाचे, सेवा कार्यतत्पर,कवी लोकसाहित्य म्हणून सुपरिचित आहेत. सांस्कृतिक, अध्यात्मिक अशा सर्व क्षेत्रात त्यांचा वावर आहे. त्यांची दोन पुस्तके सुद्धा प्रकाशित आहेत. यापूर्वी त्यांना अनेक राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांचे अनेक मानसन्मान सोहळे झाले आहेत.श्री दिनेश खैरे यांना मॉर्डन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मा. प्रा.श्री सचिन सानप (सर), नोरोसजी वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्री वसंत चाबुकस्वार(सर),प्रबंधक, श्री राजेंद्र तागडे(सर), डॉ. प्रकाश चौधरी (सर )डॉ. श्री. लक्ष्मण चौधरी (सर), डॉ.श्री अशोक उबाळे (सर) सहसंचालक(उच्च शिक्षण) विभाग पुणे, डॉ. अर्चना बोऱ्हाडे (मॅडम) प्रशासन अधिकारी(उच्च शिक्षण )विभाग पुणे. श्री अरविंद भागवत सर,श्री माणिक मुंडे सर,श्री बाळासाहेब पोटे सर,श्री विनायक चव्हाण सर,श्री विजय सावरतकर सर,माजी गटशिक्षणाधिकारी श्री ए.बी. पाटील सर,प्रा.सौ संजीवनी पाटील (मॅडम),श्री नामदेव गवळी सर,श्री सुरेश पाटील सर,श्री राजाराम साधले सर,श्री देवदास जामदार गुरुजी,श्री शिवाजीराव हराळे मास्तर, श्री सतीश गोगावले,श्री राम यादव सर,आदींचे मार्गदर्शन लाभले.