Ads
Ads

शिरूर शहरातील बंद झाला यशस्वी! शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांनी राम मंदिर जीर्णोदराची दिली ग्वाही! त्यांच्या पुढारकातून बंद मागे घेत दुकाने उघडली!

 

शिरूर (भगवान श्रीमंदिलकर )

                 शिरूर शहरातील श्रीराम मंदिर येथे जो अनुचित प्रकार घडल्याचे समोर आला या घटनेच्या निषेधार्थ शिरूर शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. या अहवांना सर्व व्यापाऱ्यांनी साथ देत कडकडीत बंद पाडून बंद यशस्वी केला.
                 शिरूर हवेली चे नवनिर्वाचित आमदार माऊली आबा कटके यांनी तातडीने दखल घेऊन श्रीराम मंदिर येथे येऊन पाहणी केली. या घटलेल्या घटनेचा तीव्र निषेध  त्यांनी यावेळी केला. सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्याची सूचना पोलिस प्रशासनाला त्यांनी यावेळी दिल्या.
                ते पुढे म्हणाले की शिरूर शहरांमध्ये सर्व समाज एकोप्याने राहत आहेत. सर्वधर्म समानतेचा संदेश Image देणारे शहर म्हणून शिरूर ची ओळख आहे. मात्र काही अपप्रवृत्तीचे लोक ही शांतता व हा एकोपा बँक करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रवृत्तीस रोखण्याचे काम इथून पुढे केला जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

                या बंदचे आवाहन  विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यावतीने करण्यात आले होते. अजिंक्य तारू,रवींद्र लक्ष्मण  बेनाडे, आकाश मधुकर चाकणे, प्रसन्न जयंत भोसले, चेतना सुभाष तुबाकी यांनी शिरूर बंदाची जबाबदारी घेतली होती.
               

                  यावेळी अजिंक्य मोरेश्वर तारु 
भिमाशंकर जिल्हा सहसंयोजक यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या श्री राम मंदिर हे पुरातन असून याचा जीर्णोदराची मागणी आम्ही Image सातत्याने करत आहोत. मात्र येथील ट्रस्टी याकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा घटनेस मंदिराचे ट्रस्टीत जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मंदिराचा जिर्णोद्धार तातडीने करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
              आमदार माऊली आबा कटके म्हणाले की श्रीराम मंदिराची भूमिपूजन झाले असते ती समजली आहे मात्र या कामास का विलंब होत आहे याची माहिती घेऊन मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम लवकरात लवकर सुरू करू असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. मंदिराच्या ट्रस्टींना विश्वासात घेऊन येणारे कायदेशीर अडचणी दूर केल्या जातील असे त्यांनी तयारी सांगितले.
                ते पुढे म्हणाले की शिरूर शहर हे बाजारपेठेचे शहर आहे व्यापाऱ्यांनी कडकडीत  बंद पाळून आपणास सहकार्य केले आहे. आपण बंद मागे घ्यावा अशी विनंती करतो यावेळी त्यांच्या हस्ते व्यापाऱ्यांचे दुकानाचे शटर वर करून बंद मागे घेण्यात आला.
               यावेळी दादा पाटील फराटे, रवी काळे, शशिकांत दसगुडे, राहुल दादा पाचर्णे. नितीन दादा पाचर्णे,दादा पाटील घावटे, शरद कालेवार, आबासाहेब सरोदे, विठ्ठल घावटे, मितेश गादिया,विनोद भालेराव, बजरंग दलाचे अजिंक्य तारू, श्रीराम सेनेचे सुनील जाधव, स्वप्निल रेड्डी, उमेश शेळके,जयेश शिंदे, एजाज बागवान, मयूर थोरात,यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.