Ads
Ads

शिरूर तालुक्यात कायदा सुव्यवस्थेची लागली वाट! दिवसाढवळ्या माजी उपसरपंच हत्येचा झाला घाट! पोलीस प्रशासन मात्र वसुलीचा मांडला थाट!

शिरूर तालुक्यात कायदा सुव्यवस्थेची लागली वाट! दिवसाढवळ्या माजी उपसरपंच हत्येचा झाला घाट! 
पोलीस प्रशासन मात्र वसुलीचा मांडला थाट!

शिरूर ( भगवान श्रीमंदिलकर )

           शिरूर तालुक्यात कायदा सुव्यवस्थेची पूर्ण वाट लागली असून शिक्रापूरचे माजी उपसरपंच यांची दिवसाच्या ढवळे हत्या करण्यात आली,तालुक्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तीन स्वतंत्र पोलीस ठाणे उभारण्यात आले आहेत प्रत्येक पोलीस ठाण्यात गोपनीय विभाग असतो व स्वतंत्रता पाच पथक असते मात्र तीन पोलीस ठाणे असून  उपयोग होत नाही,सर्व सामान्य नागरिक असुरक्षित आहेत.
      शिरूर तालुक्यात कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे चित्र दिसत आहे.  पोलीस कर्मचारी फक्त वसुली करण्यात दंग आहेत. शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू आहेत. या तीन पोलीस ठाण्यावर लक्ष ठेवण्यासाठी रांजणगाव येथे स्वतंत्र उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे तरी सुद्धा पोलीस प्रशिक्षणाचा धाक गुन्हेगारी वर राहिला नसल्याचे चित्र दिसत आहे.
    शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळी हाजी चौकीत  कार्यरत असणारे सपोनि, पोलिस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी यांची महिना सात ते आठ लाखाची उलाढाल होत आहे. सपोनि व पोडनी यांना साधारण एका हॉटेल चालका कडून प्रत्येकी पाच हजार मिळत असल्याची खात्री लायक वृत्त आहे.तर इतर चौकीतील कर्मचाऱ्यांना एका व्यवसायिकाकडून चार ते आठ असे महिना येत असल्याचे समजते आहे.
 शिरूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या वसुली बहाद्दर यांने टाकळी हाजी परिसरातील व्यवसायिकाकडून वसुलीसाठी झिरो पोलीसाची नेमणूक केली असल्याचे समजते आहे. तो झिरो पोलीस सर्व अवैध व्यवसायिकांकडून दर महिना गोळा करून देत आहे. काही व्यवसायिकांकडून हा वसुली बहाद्दर ऑनलाईन घेत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
       शिरूर पोलीस ठाण्यात त्याच्या जणांचे वर्चस्व असल्याचे दिसत आहे एक शिरूर शहरातील अवैद्य व्यवसायिकांकडून वसुली करतो त्याची चौकशी सुरूच असल्याची चर्चा परिसरात होत आहे हॉटेल व धाब्यांवर अवैध दारू सह आणि ठिकाणी राजरोस वेश्या व्यवसाय सुरू असून त्याच्या कडून अधिक मलिदा मिळत आहे. हॉटेल व्यवसायिकांकडून चौकीस चार हजार ते सात हजार,सपोनि पाच हजार ते सात हजार, पो उ नि पाच ते सात हजार तसेच पोलिस ठाण्यातील वसुली पंटर आठ हजार ते पंधरा हजार रुपये एका व्यवसायिकाकडून घेत असल्याची खात्रीलायक वृत्त आहे. या मलेदार चौकीत वर्णी  लागण्यासाठी पोलीस ठाण्यात मोठी रस्सीखेच सुरू आहे असते.
                    पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायाकडून वसुलीसाठी पाच जन असून एक शहरातील वसुली पाहतो करत असून टाकळी आजी पोलीस चौकीतील हद्दीतील हातभट्टी, मटका, वेश्या व्यवसाय तसेच धाबा चालकाकडून वसुलीस करतो त्याने वसुलीसाठी एक झिरो पोलीस ही नियुक्त केले असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
                    पोलीस अधीक्षक यांच्याकडे अनेक तक्रारी गेल्या असल्या तरी वसुली पंटर यांची वसुली जोरात सुरू असल्याचे दिसते आहे.एक तक्रारदार हायकोर्टात गेला असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात होत आहे.त्या चार जनावर पोलिस अधीक्षक यांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. ( क्रमशः )
पुढील भागात काय वाचाल -
1) चौकशीचा फेरा तरी वसुली जोरात 
2) शिरूर शहरातील अवैध धंदे व होणारी वसुली.
3) मांडवगण फराटा व न्हावरे पोलीस चौकीतील   कारणामे.
4) शिक्रापूर, रांजणगाव पोलीस ठाण्याचे हद्दीतील अवैध व्यवसाय.