Ads
Ads

शिरूरकरांच्या आग्रहा मुळे महाविकास आघाडी शिरूर नगरपरिषद निवडणूक लढविणार - माजी आमदार अशोक पवार

शिरूरकरांच्या आग्रहा मुळे महाविकास आघाडी शिरूर नगरपरिषद निवडणूक लढविणार - माजी आमदार अशोक पवार

शिरूर (प्रतिनिधी ) - शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक महाविकास आघाडी लढविणार असल्याचे शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी  पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले .

                       माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे  यांच्या निवास स्थानी झालेल्या बैठकीत माजी आमदार अशोक पवार यांनी शिरूर नगरपरिषदेत सार्वत्रिक निवडणूकीतील महाविकास  आघाडीचा निर्णय जाहिर केला .

                      शिरूर शहराच्या विकासात स्वर्गीय रसिकभाऊ धारीवाल व कुटुंबाचे योगदान मोठे आहे .त्यांनी शिरूर शहराची एक नवी ओळख निर्माण केली.त्यांच्या विकासात्मक व सर्व धर्म सम भावनेची विचार धारा जपण्यासाठी हि निवडणूक लढवीत असल्याचे त्यांनी सांगितले.

                   महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून भ्रष्टचार मुक्त नगरपरिषदेचा कारभार करण्यासाठी शिरूर नगरपरिषद निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे माजी आमदार अशोक पवार यांनी सांगितले .

                         यावेळी माजी आमदार अशोक पवार, पांडुरंग थोरात , संतोष भंडारी राजेंद्र भटेवरा चंद्रकांत बोरा अमृत बोथरा सुरेश खांडरे मुन्ना चोरडिया , प्रवीण शिशुपाल रमाकांत बोरा, माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे माजी नगरसेवक मुजफर कुरेशी , संजय देशमुख . राजेंद्र ढोबळे डॉ.पोटे अबिद शेख , मंगेश खांडरे, सचिन धाडीवाल, ॲड . शिरीष लोळगे ,मितेश गादीया ,प्रितेश कोठारी , गणेश कोळपकर , यासह कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, (शरद पवार गट ) शिवसेना ( उबाठा गट ) कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार व मान्यवर नागरीक उपस्थित होते .

             यावेळी घोडगंगा कारखाना माजी संचालक पांडुरंग थोरात , माजी नगरसेवक संतोष भंडारी ,शिवसेना (उबाठा गटाचे ) संजय देशमुख, कॉगेसचे वैभव यादव ,संघपती मुन्ना चोरडिया, चंद्रकांत बोरा, ॲड. रविंद्र खांडरे, यांनी शिरूर शहराच्या विकासासाठी माजी आमदार अशोक पवार यांच्या निर्णयास पाठींबा देण्याचे जाहीर केले .

              शिरूर नगरीचे नेते प्रकाश धारीवाल यांनी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक न लढविण्याचे निर्णयामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाने आजची बैठक घेण्यात आली आहे .

          शिरूर शहराच्या विकासासाठी सर्व जेष्ठांशी चर्चा करून महाविकास आघाडीच्या माध्यमातुन निवडणुकीतील पॅनेल  तयार करणार असल्याचे सांगितले ..