Ads
Ads

शिरूरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन; युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश देणारे प्रभावी व्यासपीठ!


 

शिरूरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन; युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश देणारे प्रभावी व्यासपीठ!

शिरूर,(प्रतिनिधी ) -

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि ग्रामीण रुग्णालय शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा, मोतीनाळा, ता. शिरूर येथे होणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू व व्यसनमुक्तीबाबत जनजागृती, प्रभावी वक्तृत्व कौशल्याचा विकास आणि सामाजिक विषयांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ तसेच उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रमाणपत्र व आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकाला सहभागाचे प्रमाणपत्र दिले Image जाणार आहे.

स्पर्धेसाठी "तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम", "मोबाईल – शाप की वरदान?", "पर्यावरण संवर्धन", "आजची शिक्षण पद्धती आणि रोजगारक्षमता", "शेतकरी आत्महत्येला शासनाचे धोरण जबाबदार आहे का?" यांसारखे समकालीन विषय निश्चित करण्यात आले आहेत.

या उपक्रमाचे आयोजन ग्रामीण रुग्णालय शिरूरचे समुपदेशक श्री. राजेश कोंडू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

आयोजकांनी तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.