Ads
Ads

शासनाच्या आपत्कालीन परिस्तिथीतीत 112, 108 या क्रमाकांचा योग्य रीतीने वापर करावा - डॉ जयपाल पाटिल

शासनाच्या आपत्कालीन परिस्तिथीतीत 112, 108 या क्रमाकांचा योग्य रीतीने वापर करावा - डॉ जयपाल पाटिल 

 

679  वे आपत्ती व्यवस्थापन शिबिर टाकळीहाजी येथे संपन्न

       

शिरूर (प्रतिनिधी ) - आपत्कालीन परिस्तिथीतीत 112, 108 या क्रमाकांचा योग्य रीतीने वापर करावा असे आवाहन डॉ जयपाल पाटिल यांनी केले. ते मळगंगा अंध अपंग सेवा संस्था,टाकळीहाजी येथे आयोजित आपत्कालीन व्यवस्थापन शिबिरात बोलत होते.

             तालुक्यातील टाकळी हाजी येथे आयोजन मळगंगा अंध अपंग सेवा संस्था,टाकळीहाजी व मा. पांडुरंगआण्णा थोरात माध्यमिक विद्यालय  यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ जयपाल पाटील यांचे आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.पाटिल हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये संपादक उपसंपादक पदावर काम केले आहे. त्यांना रायगड भूषण, आदर्श कामगार, आदिवासी सेवक तसेच महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब Image आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे. त्यांना विविध विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांचे हे 679 वे आपत्ती व्यवस्थापन शिबिर होते. त्यांना 1000 आपत्ती व्यवस्थापन शिबिर आयोजित करून ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात चा मानस असून त्या दृष्टीने ते वाटचाल करीत आहेत.

अंध व अपंग बांधवांना उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी करण्यासाठीच्या कार्यात सहभागी व्हावे - जाईताई खामकर   

       संस्थेच्या अध्यक्षा जाई ताई खामकर म्हणाल्या की, माझे डोळे बारावी मध्ये शिक्षण घेत असताना डॉक्टरांच्या चुकीच्या मुदत संपलेल्या इंजेक्शनमुळे कायमचे डोळे जाऊन मी आज अंध झाले अंधव अपंगांचे काय जीवन असते ते मी अनुभवले त्यांना काय त्रास सहन करावा लागतो हे मी जाणले यासाठी मळगंगा अंध अपंग सेवा Image संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून अंध व अपंगांना आशेचा किरण निर्माण करण्यासाठी त्यांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने त्यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. विद्यालयाच्या माध्यमातून अंध व अपंगांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी संस्था कार्य करत आहे. संस्थेत शिकून गेलेले अनेक विद्यार्थी यांना नोकरी करून आपले जीवन सुखकर जगत आहेत याचा आनंद मला होत आहे.

         पुढे म्हणाले की, अंधव अपंगांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे. यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

       आपत्ती समाजामध्ये शहरी किंवा ग्रामीण भागात आपत्ती कधी निर्माण होईल  हे सांगता येत नाही मग ती नैसर्गिक आपत्ती असू देत किंवा रस्ते अपघात विजेपासून होणारे अपघात सर्पदंशामुळे निर्माण होणारी आपत्ती या Image अनेक आपत्ती पासून आपल्याला अधिक हानी होण्यापासून काय उपाय करता येऊ शकतात याबाबत डॉ . जयपाल पाटील अलिबाग यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले यावेळी प्रात्यक्षिकामध्ये त्यांनी घरगुती गॅसच्या होणाऱ्या आपत्ती किंवा समाजामध्ये एखाद्याला सर्पदंश विजेचा शॉक, पाण्यात वाहून जाणाऱ्या व्यक्तीला मदत किंवा परिसरात लागलेल्या अग्नीतांडवात आपण न डगमगता शासनाने आपल्यासाठी निर्माण केलेल्या आपत्कालीन क्रमांक 112, 108 या बाबींचा वापर प्रात्यक्षिकासह करून दाखविला यासाठी या भागातील पोलीस बांधव असतील वैद्यकीय सेवा देणारे यांचा समाजाप्रती असलेला सेवेचा भाव यावेळी सर्वांना अनुभवास आला 

        यावेळी अंध अपंग सेवा संस्थेच्या संस्थापिका जाईताई खामकर पांडुरंगा माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वातीताई थोरात, जिल्हा परिषद चे निवृत्त मुख्याधिकारी प्रभाकरजी गावडे,सविंदणे गावच्या सरपंच सौ मनीषा ताई नरवडे, उपसरपंच मालुबाई मिंडे, टाकळी हाजीच्या पोलीस पाटील सौ. मंदिलकरताई, चेअरमन बन्सी नाना घोडे,भगवान श्रीमंदिलकर, माऊलीभाऊ पवळे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. लुणावत सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार संस्थेचे अधिक्षक श्री. नितीन थोरात यांनी मानले.